Ya Kalyano Ya Phulano

या कळ्यांनो, या फुलांनो
Work
Language

या कळ्यांनो, या फुलांनो, या मुलांनो, या जरा
मंत्र वंदे मातरम हा, घोष गर्जा अंबरा

आणिले स्वातंत्र्य आम्ही झुंजुनि शत्रूसवे
हाती तुमच्या देतसे ते शुभ नव्या भाग्यासवे
रक्षणे स्वातंत्र्य आता कार्य हे इतुके करा

राहू द्या बंदूक तुमची सज्ज त्या शत्रूवरी
लक्ष असू द्या आईसम या थोर त्या शेतावरी
मातीतून त्या मोती पिकवा येऊ द्या लक्ष्मी घरा

शिवप्रभूचा लाभला हा आज तुम्हा वारसा
टिळक, गांधी, शास्त्री यांचा जीवनाचा आरसा
नेहरू अन् इंदिरा ही सांगती या सागरा