Uthi Govinda Uthi Gopala

उठी गोविंदा, उठी गोपाळा
Work
Language

उठी गोविंदा, उठी गोपाळा, उषःकाल झाला
हलके हलके उघड राजीवा नील नेत्रकमला

तुझ्यापरी बघ जीवन वारा, मिठी मारतो प्राजक्ताला
धवल केसरी मृदुल सुमांचा पाऊस अंगणी झिमझिमला

पर्णपोपटी हिंदोळ्यावर कंठ फुटतो आनंदाला
तुज भूपाळी आळवित सुंदर, चढली गगनी विहंगमाला

गोठ्यामधले मुके लेकरू पीत झुरूझुरु कामधेनूला
किती आवरु भरला पान्हा, हसवी अरुणा तव आईला