Pikalya Panacha Deth

पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा
Work
Language

दरबार जुना ह्यो हंड्या झुंबर नवं
मध्यान्ह रातीला आता लावा अत्तर दिवं
अंगअंगी मी रंग खेळते, केसामधी मरवा
पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा

नख लागंल बेतानं खुडा
केशरी चुना अन् कात केवडा
लई दिसानं रंगल विडा
व्हटाची लाली टिपुनी घ्याया मुखडा असा फिरवा

थोडी झुकून थोडी वाकते
पडला पदर लाज झाकते
नेम धरून बाण फेकते
तुमची माझी हौस इश्काची हळूहळू पुरवा