Palabhar Thamb Jara Re Vithu

पळभर थांब जरा रे विठू
Work
Language

आलो मी हितगुज कराया, जाऊ नको रे विठू
पळभर थांब जरा रे विठू

असा येऊनी भलत्या पारी
नको वाजवू पाऊल दारी
मायपित्याच्या सेवेमधुनी सांग कसा रे उठू

कूस बदलुनी बाबा-आई
घेत विसावा अबोल होई
पाय चेपिता दोघांच्या पापण्या लागू दे मिटू

करिसी का माझ्याशी कावा
तुझाच मी, तू माझा देवा
अंतर देऊ नको, नको रे, मन अपुले पालटू