Man He Tujhpashi Ramate

मन हे तुजपाशी रमते
Year
Language

मन हे तुजपाशी रमते
अन् भिरभिरते
हरते तन वेडे तुजसाठी घुटमळते
मन तुजपाशी रमते अन् भिरभिरते
हरते तन वेडे तुजसाठी घुटमळते

भय का वाटे मला
सरणाऱ्या लाजेचे
जुळणाऱ्या गाठीचे ते सरेल का
मन हे

मन हे
मन तुजपाशी रमते अन् भिरभिरते
मन हे….

माझी साथ तुझ्यासाठी
जाऊ दूर निळ्या काठी
सळसळत्या श्वासात, थरथरत्या अधरात
मिटल्याश्या डोळ्यांत हे दिसेल का

मन हे….
मन तुजपाशी रमते अन् भिरभिरते
हरते तन वेडे तुजसाठी घुटमळते

आता काय कुणा सांगू
आता काय कुणा सांगू
माझे रूप कसे पाहू

उठले हे काहूर
पडली का ही भूल
प्रेमाची चाहूल ही असेल का

मन हे….
मन तुजपाशी रमते अन् भिरभिरते
हरते तन वेडे तुजसाठी घुटमळते

भय का वाटे मला
सरणाऱ्या लाजेचे
जुळणाऱ्या गाठीचे ते सरेल का