हवास तू, हवास तू, हवास मज तू हवास तू
हवास तू, हवास तू
हवास मज तू, हवास तू
प्रिया नाचते आनंदाने, दूर उभा का उदास तू
मदनासम हे रुप देखणे, शब्दाविण हे मुक्त बोलणे
तुझ्यापुढे मज गगन ठेंगणे, ज्योती मी अन् प्रकाश तू
हवास मज तू, हवास तू
या तेजस्वी डोळ्यांमधुनी, भर दिवसा हो रात्र चांदणी
मुखचंद्राच्या कलाकलांनी, हासविणारा सुहास तू
हवास मज तू, हवास तू
तारुण्याच्या झाडावरती मोहक होऊनी बसली प्रीती
या प्रीतीच्या पूर्तीसाठी, करशील का रे प्रयास तू
हवास मज तू, हवास तू
havās tū, havās tū
havās maj tū, havās tū
priyā nāchte ānaṅdāne, dūr ubhā kā udās tū
madnāsam he rup dekhṇe, śhabdāviṇ he mukt bolṇe
tujhyāpuḍhe maj gagan ṭheṅgṇe, jyotī mī an prkāśh tū
havās maj tū, havās tū
yā tejasvī ḍoḻyāṅmdhunī, bhar divsā ho rātr chāṅdṇī
mukhachaṅdrāchyā kalāklāṅnī, hāsviṇārā suhās tū
havās maj tū, havās tū
tāruṇyāchyā jhāḍāvartī mohak hoūnī baslī prītī
yā prītīchyā pūrtīsāṭhī, karśhīl kā re pryās tū
havās maj tū, havās tū