Ghanshyam Sundara

घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला
Work
Language

घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला
उठी लवकरी वनमाळी उदयाचळी मित्र आला

आनंदकंदा प्रभात झाली उठी सरली राती
काढी धार क्षीरपात्र घेऊनी धेनु हंबरती
लक्षिताती वासुरें हरी धेनु स्तनपानाला
उठी लवकरी वनमाळी उदयाचळी मित्र आला

सायंकाळी एकेमेळी द्विजगण अवघे वृक्षी
अरुणोदय होताच उडाले चरावया पक्षी
प्रभातकाळी उठुनि कावडी तीर्थ पथ लक्षी
करूनी सडासंमार्जन गोपी कुंभ घेऊनी कुक्षी
यमुनाजळासि जाति मुकुंदा दध्योदन भक्षी

कोटी रवीहूनि तेज आगळे तुझिया वदनाला
होनाजी हा नित्य ध्यातसे हृदयी नाममाला
उठी लवकरी वनमाळी उदयाचळी मित्र आला