गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जाळू दे
सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो
सारखे अस्तित्व माझे पेटताना दरवळू दे
लाभू दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतु
तापल्या मातीत माझ्या घाम मानाने गळू दे
गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जाळू दे
सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो
सारखे अस्तित्व माझे पेटताना दरवळू दे
लाभू दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतु
तापल्या मातीत माझ्या घाम मानाने गळू दे
gaṅjalyā oṭhās mājhyā dhār vajrāchī miḻū de
āṅdhaḻyā ātmyāt mājhyā sūry satyāchā jāḻū de
sārkhe sauṅdary mājhyā koraḍyā gātrī khaḻāḻo
sārkhe astitv mājhe peṭtānā daravḻū de
lābhū de lāchār chhāyā moṭhmoṭhyāṅnā paraṅtu
tāpalyā mātīt mājhyā ghām mānāne gaḻū de