दृष्ट लागण्या जोगे सारे, गालबोटही कुठे नसे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे
स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे
दोघांनाही जे जे हवे ते होईल साकार येथे
आनंदाची अन् तृप्तीची शांत साउली इथे मिळे
जुळुले रे नाते अतूट, घडे जन्मजन्मांची भेट
घेउनिया प्रीतीची आण, एकरूप होतील प्राण
सहवासाचा सुगंध येथे आणि सुगंधा रूप दिसे
दृष्ट लागण्या जोगे सारे, गालबोटही कुठे नसे
Year
Language
dṛṣhṭ lāgaṇyā joge sāre, gālboṭhī kuṭhe nase
jag doghāṅche ase rachū kī svarg tyāpuḍhe phikā paḍe
svapnāhūn suṅdar gharṭe manāhūn asel moṭhe
doghāṅnāhī je je have te hoīl sākār yethe
ānaṅdāchī an tṛptīchī śhāṅt sāulī ithe miḻe
juḻule re nāte atūṭ, ghaḍe janmjanmāṅchī bheṭ
gheuniyā prītīchī āṇ, ekrūp hotīl prāṇ
sahvāsāchā sugaṅdh yethe āṇi sugaṅdhā rūp dise