Devachiye Dwari

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी
Work
Language

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी
तेणें मुक्ती चारी साधियेल्या
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा
पुण्याची गणना कोण करी
असोनि संसारी जिव्हे वेगु करी
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे
द्वारकेचे राणे पांडवाघरी